Saturday, May 31, 2008

mogara
मोगरा फ़ुलला म्हणुन कोणी पाही
आणि त्या फ़ुलाला देवावर वाहुन जाई

फ़ुलाचे फ़ुलणे नियम स्रुष्टिचा
काय अधिकार आपल्याला ते खुडण्याचा?

मोगरा फ़ुलली म्हणुन कोणी पाही
आणि तिला क्षणात चुरगाळून ही जाई.
prasanna gk.
येऊ का मी?
भरून आले घन हे दाट,
पाहु किती मी त्याची वाट?

थेम्ब थेम्ब पडला धरतीवरी,
मला हळुच खुण करी

रप रप पडतो पाऊस,
आणि मला म्हणतो नको भिजुस,

घनघोर बरसती अखंड धारा,
भिजला आसमंत सारा,

जाता जाता तो पुन्हा आला,
मला पुरती चिम्ब भिजवून गेला.

prasanna gk.
मैत्री की विश्वास
बोलत होते बायको नवरा
मैत्रिण आली करुन नखरा

बायको गेली उठून
मैत्रिण म्हणाली लाडावून

बघ कशी रागावून गेली
नवरा म्हणाला,विश्वास किती दाखवून गेली
प्रसन्ना जीके
तुझे प्रेम
तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे
प्रसन्ना जीके
college
आमच किनै कौलेज खुप छान
जस प्रसादाच्या शिर्‍यावर तुळशीच पान
खुप मोठ आंगण त्यातच खेळाच साधन
जमून मित्र मैत्रीणी सारे घालुया मस्त पिंगण
वर्ग कसे खुप मोठे,शोधायचे सांग तुला कुठे?
क्लास बंग करुन तु फ़िरायला जातोस कुठे?
कौलेज कट्टा म्हणुन पायरीवर बसतो
मला पाहुन गालात नुसताच हसतो
अरे जरा वर्गात बसत जा ना
क्लास च नाही पण जरा परिक्षेचा विचार कर ना
नापास झालास तर आई वडिल होतील खिन्न
पास होऊन कर ना त्यांना तू प्रसन्न
अभ्यास झाल्यावर करुया थोद दंगा
हे दिवस परत येतील का सांग ना?

prasanna gk